टॉप न्यूजमनोरंजन

गदर 2 के ट्रेलर लॉन्च के दौरान सनी देओल हुए भावुक; बोले, “दोनों देशों के लोग…”

मुंबई, 27 जुलै : सनी देओल आणि अमिशा पटेल यांचा ‘गदर 2’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.  अखेर गदर 2 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. सिनेमाच्या भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. सिनेमाची संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती.  ट्रेलर लाँचवेळी अभिनेता सनी देओल भावुक झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा भावुक क्षण कॅमेरात कैद करण्यात आला आहे. यावेळी बोलताना सनी देओलनं भारत आणि पाकिस्तानविषय महत्त्वाचं वक्तव्य देखील केलं आहे. गदर 2 सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा सेन्सर बोर्डामुळे उशिरा झाला असं सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितलं.  सिनेमाला सेन्सर सर्टिफिकेट संध्याकाळी 5.30 वाजता मिळाला. सेन्सर बोर्ड ट्रेलरला सेन्सर सर्टिफिकेट देण्याआधी संशोधनाची मागणी केली होती. बोर्डाने सिनेमातील काही डायलॉग म्यूट केले आणि सेन्सर सर्टिफिकेट दिलं. हेही वाचा –

सिनेमाच्या ट्रेलरवेळी कलाकार आणि गायक अशी संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी सकिना आणि तारा सिंहच्या गेटअपमध्ये येत सगळ्यांना सरप्राइज दिलं. यावेळी सर्वांशी बोलताना सनी देओल चांगलाच भावुक झाला. तो म्हणाला, “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात अत्यंत शांतताप्रिय लोक आहेत. राजकीय दोघारोपांच्या खेळामुळे दोन्ही देशांत द्वेष निर्माण होतोय. खरं म्हणजे दोन्ही देशातील लोकांना भांडण नको आहे. कारण शेवटी देश वेगळे असले तरी सगळे एकाच मातीतले आहेत”.

त्याचप्रमाणे अभिनेत्री अमिषा पटेलनं देखील गदर रिलीज होण्याआधी लोक त्याला गटर म्हणाले होते असं अमिषाने सांगितलं. अमिषा म्हणाली, “जेव्हा दिग्दर्शक माझ्याकडे गदरची स्टोरी घेऊन आले तेव्हा इंडस्ट्रीमधील अनेक मोठ मोठ्या लोकांनी मला तू हा सिनेमा का करत आहेस असं विचारलं होतं. लोक गदर रिलीज होण्याआधी त्याला गटर म्हणत होते. पण आज त्याच सिनेमाचा 22 वर्षांनी सिक्वेल रिलीज होतोय. गदर 2 देखील ब्लॉकबस्टर होईल”.

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली आहे. सिनेमा 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button